Posts

Showing posts with the label ModiSkill

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार कार्यशाळा

मी स्वत: उन्हाळी सुट्यांमध्ये व्यावसायिक मोडी लिप्यंतरकारांसाठी एक मार्गदर्शनपर वर्कशॉप ऑनलाईन व प्रत्यक्ष घेण्याचा विचार करत आहे. काही मुद्दे डोक्यात आहेत. ह्या वर्कशॉपची फी असेल. इतर सर्व विवरण मी लवकरच सर्व प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करेन. ज्यांना व्यावासायिक लिप्यंतरकार म्हणून जबाबदारीने दीर्घकाळ काम करण्याची इच्छा आहे केवळ त्यांनीच संपर्क साधावा. ह्या वर्कशॉपमधून काय किंवा कश्यासंबंधी माहिती अपेक्षित आहे हे कळविण्यासाठी खालील लिंकवर असलेला फॉर्म भरावा. ज्यांनी फॉर्म भरलेला असेल केवळ त्यांच्याशीच मी स्वत: संपर्क साधेन. Loading…

काय असेल हा शब्द?

Image
आधीच मोडी ही भरभर लिहिता येण्यासाठी तयार केलेली लिपी आहे. त्यात स्वत:च्या शैलीमुळे लेखनिक नवीन वाचकांसाठी एक-एक आव्हानच उभं करत असतात. पहिल्या वाचनात हा शब्द ‘पचजाग’ असा वाचला जाईल. अगदीच संशयाला वाव नको म्हणून ‘पचनाग, पचफग’ असंही वाचन केलं जाईल. पण मूळ मोडी शब्द आहे - पच्याग. पंचांग हा शब्द पंच्यांग असा लिहिण्याच्या प्रयत्नात लेखनिकांनी शब्दातले दोन अनुस्वार वगळले आहेतच पण ‘या’ ह्या अक्षराचं रुप किती बदललं आहे पहा. मोडीचा अभ्यास करताना शिकलेली अक्षरं आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधील अक्षरांमध्ये काय फरक असतो हे वाचनाचा सराव करतानाच कळतं.

विकृत कि विक्रीत?

Image
संदर्भाने वाचन करणे योग्य कसे ठरते हे दाखवणारा आणखी एक नमुना.  लाल चौकटीने दर्शविलेलं हे मोडी अक्षर आहे ‘कृ’. प्रत्यक्ष शब्द ‘विक्रीत’ असा आहे . त्यामुळे ‘क्री’ ह्या अक्षरासाठी  ‘  ’ अश्या प्रकारे मोडीत लिहिले जाणे अपेक्षित आहे. पण एक-दोन अपवाद वगळता सर्वच मोडी लेखनिक ‘क्री’ लिहिताना लाल चौकटीत दर्शविल्याप्रमाणे लिहितात. मोडी वाचकाने हे लक्षात ठेवायचं आहे कि वाचन व लिप्यंतर करताना ह्या अक्षराचं लिप्यंतर क्री असंच करायचं आहे . अन्यथा शब्दाचा अर्थ विक्रीत ऐवजी विकृत असा होईल. 

हे काय लिहिलेले आहे?

Image
हे काय लिहिलेले असावे? पावगी पटा ग्वाले नंबर? कि आणखी काही?

अंकी रक्कम

Image
सर्वसाधारणपणे, करारपत्र किंवा धनादेशात रकमेचे अंक आधी लिहिले जातात आणि त्यानंतर तेच आकडे अक्षरांमध्ये लिहून अंकात लिहिलेली रक्कम योग्य असल्याबद्दल पुष्टीकरण केलं जातं. त्यासाठी ‘अक्षरी’ हा शब्द वापरून मगच पुढे अक्षरी रक्कम लिहिली जाते. पण ह्या मोडी दस्तऐवजात मात्र नेमका उलट प्रकार केलेला आहे.आधी रकमेचे आकडे अक्षरांमध्ये लिहिले आहेत आणि मग ‘अंकी’ असं लिहून रकम अंकांमध्ये लिहिली आहे.

काप दापोली

Image
‘काप दापोली’ असा उल्लेख मोडी कागदपत्रांमधून आढळतो. काप दापोली म्हणजे कॅम्प दापोली. ब्रिटिशांनी दापोली येथे जे लष्करी ठाणे वसवले त्याला कॅम्प दापोली म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे काप दापोली.

आन

Image
अन = आणखी, शिवाय अन = अन्य, दुसरा आनवस्त्र = अन्नवस्त्रे. उपजीवीकेची सोय, पोटापाण्याची व्यवस्था. आनभऊन = अनुभवून. आनंद घेऊन, उपभोग घेऊन. वरील दोन्ही उदाहरणांत ‘आन’ म्हणजे शपथ (“तुला देवाची आण आहे”) असा शब्दप्रयोग अपेक्षित नाही. ‘आन’ ह्या शब्दाचे मराठी बोलीभाषांमध्ये अनेक अर्थ होतात. ‘आणि’ ह्या सम्मुचयबोधक उभयान्वयी अव्ययाचा ‘अन्‌’ ह्या प्रमाणेच ‘आन’ हा देखील एक अपभ्रंश आहे.

बिनकैफी शब्दाचा अर्थ

Image
बिनकैफी म्हणजे नशापाणी केलेले नसताना, अंमली पदार्थाच्या किंवा मद्याच्या प्रभावाखाली नसताना (कैफ चढलेला नसताना).

तंजावरी पत्रांमधील 'ब' आणि 'बा'

Image
तंजाऊर येथील अनेक मोडी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या उच्चारांसाठी एकच अक्षर वापरले जाते असे आढळून आले आहे. हे अक्षर प्रचलित मोडी 'ब' अक्षरासारखेच दिसते. मात्र अक्षराचा काना जेथे शिरोरेघेला स्पर्श करून संपतो तेथे आतल्या बाजूस एक लहानसा वक्राकार देऊन देवनागरी 'प'सदृश आकार तयार केला जातो. आजवर प्रसिद्ध झालेल्या बऱ्याच तंजावरी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या दोन्ही उच्चारांसाठी अश्या प्रकारचे अक्षर लिहिल्याचे आढळून आले आहे.

दिगरबाद

Image
दिगर+बाद = अन्य+रद्द. इथे दिगरबाद चा अर्थ - ‘जे काही अनाठायी आहे ते (स्वखर्चाने) रद्द करून देईन’ असा आहे. ‘आबाद’ हा उर्दू प्रत्यय लावून येणाऱ्या अहमदाबाद, इलाहाबाद, हैदराबाद ह्या शब्दांपैकी दिगरबाद हा शब्द नाही.

जांगळी - स्थानिक शब्द

Image
अनेकदा कागदपत्रांमधून स्थानिक भाषांमधले शब्द जसेच्या तसे लिहिलेले असतात. त्यांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी हाताशी शब्दकोश असावा. शब्दकोशात जांगळी किंवा जांगली ह्या शब्दाचा अर्थ गुराखी असा आहे.

एकच लेखनिक एक अक्षर निरनिराळ्या पद्धतीने कसे लिहितो

Image
मोडी लेखनिकाची अक्षरे लिहिण्याची पद्धत कधीही बदलत नाही, हेही एक मिथकच! ह्या एकाच कागदात लेखनिकाने दोन निरनिराळ्या प्रकारे ’खु’ लिहिला आहे तर दुसऱ्या कागदात त्याच लेखनिकाने ’खु’ लिहिताना आणखी वेगळ्या प्रकारे लिहिला आहे.

'क्री’ अक्षर लिहिण्याची निराळी पद्धत

Image
मोडी लिपीमध्ये ’कृ’ अक्षर लिहिण्याची पद्धत आपल्याला माहित आहे पण तेच अक्षर ’क्री’ लिहिण्यासाठीदेखील उपयोगात आलेले फारसे पाहण्यात येत नाही. सामान्यत: मोडी ’क’ ला देवनागरी ’क्र’ मधील अर्धा ’र’ जोडण्यात येतो.

’र’का रूपांतर (तपसीलवार)

Image
तपसीलवार (mr:तपशीलवार ) अर्थात विस्तृत (detailed). मराठीत वाचा. मोडी लिपी में 'र' अक्षर को विविधता से जोडा जा सकता है । यह शब्द इसी का उदाहरण है । जिन अक्षरोंको शिरोरेखापर समाप्त होने से पूर्व गांठ दी जाती है, उन अक्षरोंके साथ 'र' जोडनेका यह एक प्रकार है ।

’र’ची करामत (तपसीलवार)

Image
तपसीलवार (तपशीलवार ) म्हणजे सविस्तर (detailed). हिंदी में पढ़िए । मोडी अभ्यासकांनी 'र' ची करामत पाहिलेली आहे. ज्या अक्षरांना शिरोरेघेवर जाऊन समाप्त होण्यापूर्वी गाठ दिली जाते, अश्या अक्षरांना 'र' जोडायचा झाल्यास तो खालील प्रकारे जोडता येतो.

प्राचीन और आधुनिक अक्षरों के बीच का भेद २

’राजीखुषीने’ अर्थात अपनी इच्छा से । मराठीत येथे वाचा. शब्द एकही है लेकिन हर अभिलेखमें अलग-अलग लेखनिकका हस्ताक्षर, लेखनकी गती और विभिन्न लेखन साधनोंके कारण इस शब्दके अक्षरोंमें भी विविधता दिखाई दे रही है ।

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद २

’राजीखुषीने’ म्हणजे स्वेच्छेने. हिंदी में यहॉं पढिए । शब्द एकच पण प्रत्येक कागदपत्रामध्ये निरनिराळ्या लेखनिकाचे हस्ताक्षर, लेखनाची गती आणि लेखन साधनांतील वैविध्यामुळे ह्या शब्दामध्येही विविधता दिसून येत आहे.

प्राचीन और आधुनिक अक्षरों के बीच का भेद

Image
Read in Marathi मोडी लिपी सिखते हुए लेखनका अभ्यास करते समय अक्षरोंका आकर अनुरूप हो, अक्षर सुंदर ना सही किंतू सुवाच्य हो जैसी बातों पर हम द्यान देते है । बोरू या कट्‌ निब पेन से लेखन करते है । लेकिन ऐतिहासिक दस्तावेजोंका अक्षर ध्यान से देखें तो हमारा मोडी लेखन का सराव और उस दस्तावेजों के मोडी अक्षर में बहुत अंतर दिखाई देता है ।

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद

Image
Read in Hindi मोडी लिपी शिकत असताना लेखनाचा सराव करते वेळेस अक्षरांची वळणं प्रमाणबद्ध असावीत, अक्षर सुंदर नसलं तरी सुवाच्य असावं ह्याकडे आपण लक्ष पुरवतो. बोरू किंवा कट्‌ निबच्या लेखणीने लेखन करतो. पण ऐतिहासिक कागदपत्रांमधील अक्षर नीट न्याहाळलं तर आपला मोडी लेखनाचा सराव आणि त्या कागदपत्रांमधील अक्षरांची वळणं ह्यात अंतर असल्याचं दिसून येतं.

मोडी लेखन पद्धती २

Image
विचार करून मेंदूचा भुगा पडला पण हा शब्द काही केल्या कळेना. 😥 पूर्ण कागदात सगळीकडे हा शब्द होता पण त्या माणसाने नेमकं काय गहाण ठेवलंय हे लक्षातच येत नव्हतं. नंतर एका ठिकाणी ’शिंगे’ असा शब्द वाचल्यावर कळलं कि तो न कळलेला शब्द ’टोणगा’ असा आहे.