Posts

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

पाठ १ मोडी लिपीचा इतिहास आणि आवश्यकता

Image
महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर सुरू असताना मोडी लिपीची गरज का भासली? मोडी लिपीचा शोध कोणी लावला? अश्या काही प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओत दिलेली आहेत.

आन

Image
अन = आणखी, शिवाय अन = अन्य, दुसरा आनवस्त्र = अन्नवस्त्रे. उपजीवीकेची सोय, पोटापाण्याची व्यवस्था. आनभऊन = अनुभवून. आनंद घेऊन, उपभोग घेऊन. वरील दोन्ही उदाहरणांत ‘आन’ म्हणजे शपथ (“तुला देवाची आण आहे”) असा शब्दप्रयोग अपेक्षित नाही. ‘आन’ ह्या शब्दाचे मराठी बोलीभाषांमध्ये अनेक अर्थ होतात. ‘आणि’ ह्या सम्मुचयबोधक उभयान्वयी अव्ययाचा ‘अन्‌’ ह्या प्रमाणेच ‘आन’ हा देखील एक अपभ्रंश आहे.

बिनकैफी शब्दाचा अर्थ

Image
बिनकैफी म्हणजे नशापाणी केलेले नसताना, अंमली पदार्थाच्या किंवा मद्याच्या प्रभावाखाली नसताना (कैफ चढलेला नसताना).

तंजावरी पत्रांमधील 'ब' आणि 'बा'

Image
तंजाऊर येथील अनेक मोडी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या उच्चारांसाठी एकच अक्षर वापरले जाते असे आढळून आले आहे. हे अक्षर प्रचलित मोडी 'ब' अक्षरासारखेच दिसते. मात्र अक्षराचा काना जेथे शिरोरेघेला स्पर्श करून संपतो तेथे आतल्या बाजूस एक लहानसा वक्राकार देऊन देवनागरी 'प'सदृश आकार तयार केला जातो. आजवर प्रसिद्ध झालेल्या बऱ्याच तंजावरी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या दोन्ही उच्चारांसाठी अश्या प्रकारचे अक्षर लिहिल्याचे आढळून आले आहे.

दिगरबाद

Image
दिगर+बाद = अन्य+रद्द. इथे दिगरबाद चा अर्थ - ‘जे काही अनाठायी आहे ते (स्वखर्चाने) रद्द करून देईन’ असा आहे. ‘आबाद’ हा उर्दू प्रत्यय लावून येणाऱ्या अहमदाबाद, इलाहाबाद, हैदराबाद ह्या शब्दांपैकी दिगरबाद हा शब्द नाही.