Posts

Showing posts with the label ModiSkill

दोन अपरिचित शब्द

Image
हे दोन शब्द नेहमीच्या मोडी दस्तऐवजांमध्ये क्वचितच आढळतात. त्यातच जर मोडी लेखन गुंतागुंतीचे असेल तर योग्य शब्द कळूनदेखील त्यांची खात्री वाटत नाही. कधी, कधी अशी परिस्थिती असते कि लेखन अतिशय किचकट असतं आणि ह्या दोन शब्दांशिवाय काहीच वाचता येत नाही. पण हे नवीन कळलेले दोन शब्दच संपूर्ण वाक्याचा अर्थ उलगडायला मदत करतात.

मोडी ’सु’ निराळे अक्षर

Image
काही दिवसांपूर्वी एका मोडी दस्तऐवजामध्ये ’सु’ हे अक्षर निराळ्या पद्धतीने लिहिलेले आढळले. आजवर वाचलेल्या कागदपत्रांमध्ये ’सुहूर ’ किंवा ’सूद’ सारखे शब्द लिहिताना पारंपारिक ’सु’ हेच अक्षर वाचलेले होते. जर संदर्भाने वाचन करण्याची सवय नसेल तर अश्या नवीन प्रकारे काढलेल्या अक्षरामुळे शब्दाची गफलत होऊ शकते.

रूपये व्याज सुद्धा मोडी लेखन पद्धती

Image
रूपये व्याज सुध्धा ( रूपये व्याज सुद्धा ) लिहिण्याची पद्धत पहा. "ये" अक्षरामधील मात्रा वरच थांबविता आली असती पण ती पुन्हा वळवून शिरोरेघेवर आणून थांबवली आहे. इतकंच नव्हे तर "व्याज" शब्द लिहिताना मोडी ’व’ ला देवनागरीसम "या"जोडला आहे पण तो देवनागरी "पा" सारखा दिसतोय.

मोडी लिप्यंतर कौशल्य २

Image
मोडी दस्तऐवजामधील शब्द वाचता येतो पण त्याचा अर्थ लागत नाही असे अनेकदा होते. अश्या वेळेसे संदर्भाने वाचन कसे करावे याचे एक उदाहरण.

मोडी लिप्यंतर कौशल्य १

Image
मोडी लेखन तारतम्याने वाचायचं म्हणजे काय? पहिलं चित्र पहा. हा शब्द ’माझी’ असा मोडीत लिहिलेला आहे हे सांगूनही पटणार नाही कारण मोडीतलं ’झ’ हे अक्षर ’कर’ सदृश दिसतंय आणि पुढील पूर्ण वेलांटी म्हणजे ’नी’ हे अक्षर वाटतंय. ’झ’ अक्षराच्या पोटातून सुरू होणारा काना व वेलांटी अक्षराच्या शेपटाकडून सुरू होतेय. गोंधळ उडणं साहजिक आहे.