Posts

आन

Image
अन = आणखी, शिवाय अन = अन्य, दुसरा आनवस्त्र = अन्नवस्त्रे. उपजीवीकेची सोय, पोटापाण्याची व्यवस्था. आनभऊन = अनुभवून. आनंद घेऊन, उपभोग घेऊन. वरील दोन्ही उदाहरणांत ‘आन’ म्हणजे शपथ (“तुला देवाची आण आहे”) असा शब्दप्रयोग अपेक्षित नाही. ‘आन’ ह्या शब्दाचे मराठी बोलीभाषांमध्ये अनेक अर्थ होतात. ‘आणि’ ह्या सम्मुचयबोधक उभयान्वयी अव्ययाचा ‘अन्‌’ ह्या प्रमाणेच ‘आन’ हा देखील एक अपभ्रंश आहे.

बिनकैफी शब्दाचा अर्थ

Image
बिनकैफी म्हणजे नशापाणी केलेले नसताना, अंमली पदार्थाच्या किंवा मद्याच्या प्रभावाखाली नसताना (कैफ चढलेला नसताना).

तंजावरी पत्रांमधील 'ब' आणि 'बा'

Image
तंजाऊर येथील अनेक मोडी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या उच्चारांसाठी एकच अक्षर वापरले जाते असे आढळून आले आहे. हे अक्षर प्रचलित मोडी 'ब' अक्षरासारखेच दिसते. मात्र अक्षराचा काना जेथे शिरोरेघेला स्पर्श करून संपतो तेथे आतल्या बाजूस एक लहानसा वक्राकार देऊन देवनागरी 'प'सदृश आकार तयार केला जातो. आजवर प्रसिद्ध झालेल्या बऱ्याच तंजावरी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या दोन्ही उच्चारांसाठी अश्या प्रकारचे अक्षर लिहिल्याचे आढळून आले आहे.

दिगरबाद

Image
दिगर+बाद = अन्य+रद्द. इथे दिगरबाद चा अर्थ - ‘जे काही अनाठायी आहे ते (स्वखर्चाने) रद्द करून देईन’ असा आहे. ‘आबाद’ हा उर्दू प्रत्यय लावून येणाऱ्या अहमदाबाद, इलाहाबाद, हैदराबाद ह्या शब्दांपैकी दिगरबाद हा शब्द नाही.

२३ जानेवारी - जागतिक हस्ताक्षर दिन

Image
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने केलेला मोडी लेखनाचा सराव.