भारत इतिहास संशोधक मंडळ
भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी केली.
येथे १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,०००हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत.भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळ हे एक त्रैमासिक जर्नल जारी करते. या नियतकालिकात नवीन शोधांवरील निबंध आणि लेख सादर केले जातात. मंडळाने अनुभवी इतिहासकारांच्या वार्षिक परिषदांच्या आणि इतिहासकारांच्या अन्या बैठकीच्या अहवालांद्वारे लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.
-स्रोत: विकीपीडिया, मराठी विश्वकोश.
पत्ता: १३२१, विश्रामबाग वाडा, सदाशीव पेठ, पेरूगेट, पुणे ४११०३०.
फोन: ०२२ २४४७ २५८१
गुगल मॅप: https://goo.gl/maps/oqLyCnddaiydRWn58