Posts

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.



आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी



आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई
Phone: 9920028859 | Email: kanchankarai@gmail.com

👇 मोडी लिपीबद्दल अधिक वाचा. 👇

पुराभिलेख संचालनालय मोडी लिपी प्रशिक्षण २०२६

पुराभिलेख संचालनालयाच्या कोकण विभाग १, कोकण विभाग २, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या महसूली विभागातील मोडी प्रशिक्षण केद्रांचा तपशिल पुढील PDF मध्ये समाविष्ट केला आहे. येथून PDF डाऊनलोड करून घ्यावी. प्रशिक्षणाचे स्वरुप पुढीलप्रमाणे: कालावधी: १०+१ (दहा दिवस प्रशिक्षण आणि अकराव्या दिवशी परीक्षा). सत्र: सकाळी किंवा सायंकाळी २ तास (दोन प्रशिक्षक प्रत्येकी एक तास याप्रमाणे) वेळ: केंद्राच्या ठिकाणी कळवली जाईल. शुल्क:: विद्यार्थ्यांसाठी ₹ ३०० आणि इतरांसाठी (शिक्षक , प्राध्यापक इ.) ₹ ६००   प्रवेश अर्ज केंद्रावर उपलब्ध असतील. प्रवेश घेण्यासाठी जाताना स्वत:चे २ पासपोर्ट आकाराचे फोटो (एक अर्जावर व एक प्रमाणपत्रावर चिकटवण्याकरता लहान आकारातील), आधार किंवा तत्सम ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत, प्रशिक्षण शुल्क ₹ ६००/- (विद्यार्थी असल्यास शुल्क ₹ ३००/-) सोबत घेऊन जावे. कृपया नोंद घ्यावी: पुराभिलेख संचालनालयाचे पुणे विभागाचे मोडी लिपीचे प्रशिक्षण व परीक्षा पूर्वीच आटोपलेली आहे.

मोडी मजकूरातील अक्षरे देवनागरी लिप्यंतरात बदलून घ्यावीत का?

Image
योग्य मराठी शब्द माहित आहे म्हणून मोडी लिपीतला मजकूर देवनागरीत लिप्यंतर करताना अक्षराचा बदल करू नये. जर विश्वास हा शब्द मोडी लिपीमध्ये विस्वास असा लिहिलेला असेल तर तो देवनागरीत लिप्यंतर करताना विस्वास असाच करावा. मोडी पत्रांमधून बल्लाळ हे आडनाव बलाल किंवा शिवाजी हे नाव सिवाजी असे लिहिलेले असते पण योग्य मराठी नावे आपल्याला माहित आहेत म्हणून देवनागरी लिप्यंतरात आपल्याला हवे तसे बदल करून घेऊ नयेत. मोडी मजकूरातील अक्षरे जशी वाचली तशीच ती देवनागरीत लिप्यंतर करणे ह्यालाच असल बरहुकूम नकल म्हणतात. म्हणजेच मूळ (मोडी मजकूर असलेल्या ) दस्तऐवजाची (देवनागरी लिपीमध्ये तयार केलेली) एक हुबेहूब प्रत.

दीपावली शुभचिंतन २०२५

Image
आमचे सर्व क्लायंट्स, सहकारी आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

मोडी अभ्यासकांना महाराष्ट्र शासनाच्या नामिकेत सहभागी होण्याची संधी

Image
प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील "इंग्रजी मजकुराचा मराठीमध्ये तसेच मराठी मजकुराचा इंग्रजीमध्ये अनुवाद" करू शकणाऱ्या अनुवादकांची मानधन तत्त्वावर नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी मोडी मजकुराचा इंग्रजी व मराठीमध्ये अनुवाद, इंग्रजीतून मराठीमध्ये तसेच मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतच्या अटी, शर्ती व इतर सविस्तर माहिती खालील फोटोमध्ये दिलेली आहे. तसेच, भाषा संचालनालयाच्या https://directorate.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधितांनी मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन करण्यात येतआहे.

Palaeographic Perspectives on Modi Script: Part 1 – Script Confusions

Abstract This paper examines a paleographic challenge in Modi script, where the fluidity of handwriting often blurs the distinction between characters. By analyzing an example in which the consonant kha is rendered almost identically to the vowel ā, the study highlights how scribal inconsistencies complicate interpretation. Such confusion demonstrates the need for readers to rely not only on graphic comparison within a manuscript but also on contextual knowledge of Marathi vocabulary. The analysis underscores the importance of cross-referencing, linguistic intuition, and paleographic expertise when deciphering Modi documents. 👉 Click here to download the full research paper (PDF) — Karai, Kanchan Modi Script Transliterator & Researcher Citation Note: Readers and researchers are requested to cite this work as indicated below when referring to it in their publications. Suggested Citation (APA): Karai, Kanchan. (2025). Paleographic Perspectives on Modi Script: Part 1 – Scr...