पुराभिलेख संचालनालय मोडी लिपी प्रशिक्षण २०२६

पुराभिलेख संचालनालयाच्या कोकण विभाग १, कोकण विभाग २, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या महसूली विभागातील मोडी प्रशिक्षण केद्रांचा तपशिल पुढील PDF मध्ये समाविष्ट केला आहे.

येथून PDF डाऊनलोड करून घ्यावी.

प्रशिक्षणाचे स्वरुप पुढीलप्रमाणे:

कालावधी: १०+१ (दहा दिवस प्रशिक्षण आणि अकराव्या दिवशी परीक्षा).

सत्र: सकाळी किंवा सायंकाळी २ तास (दोन प्रशिक्षक प्रत्येकी एक तास याप्रमाणे)

वेळ: केंद्राच्या ठिकाणी कळवली जाईल.

शुल्क:: विद्यार्थ्यांसाठी ३०० आणि इतरांसाठी (शिक्षक, प्राध्यापक इ.) ६००

 प्रवेश अर्ज केंद्रावर उपलब्ध असतील. प्रवेश घेण्यासाठी जाताना स्वत:चे २ पासपोर्ट आकाराचे फोटो (एक अर्जावर व एक प्रमाणपत्रावर चिकटवण्याकरता लहान आकारातील), आधार किंवा तत्सम ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत, प्रशिक्षण शुल्क ६००/- (विद्यार्थी असल्यास शुल्क ३००/-) सोबत घेऊन जावे.

कृपया नोंद घ्यावी: पुराभिलेख संचालनालयाचे पुणे विभागाचे मोडी लिपीचे प्रशिक्षण व परीक्षा पूर्वीच आटोपलेली आहे.