Posts

Showing posts with the label Announcements

मोडी अभ्यासकांना महाराष्ट्र शासनाच्या नामिकेत सहभागी होण्याची संधी

Image
प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील "इंग्रजी मजकुराचा मराठीमध्ये तसेच मराठी मजकुराचा इंग्रजीमध्ये अनुवाद" करू शकणाऱ्या अनुवादकांची मानधन तत्त्वावर नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी मोडी मजकुराचा इंग्रजी व मराठीमध्ये अनुवाद, इंग्रजीतून मराठीमध्ये तसेच मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतच्या अटी, शर्ती व इतर सविस्तर माहिती खालील फोटोमध्ये दिलेली आहे. तसेच, भाषा संचालनालयाच्या https://directorate.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधितांनी मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन करण्यात येतआहे.