मोडी लिपी प्रशिक्षण - पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात मोडी लिपीतील महत्वाचे अभिलेख आहेत. सदर अभिलेख वाचण्यासाठी वाचक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच भारतीय ऐतिहासिक कागदपत्र आयोग, नवी दिल्ली यांच्या ४६ व्या अधिवेशनातील ठराव क्रमांक ७ नुसार पुराभिलेख संचालनालयामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग योजना कायमस्वरुपी राबविण्यासाठी दि.२९ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयान्वये नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण १ व कोकण २ ह्या सात महसूली विभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ७ प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे प्रशिक्षण प्रत्यक्ष घेतले जाते, ऑनलाईन नाही. प्रशिक्षण आयोजित करण्याचा दिनांक निश्चित झाला की उपरोल्लेखित सात विभागांमधील केंद्रांचे स्थळ, पत्ता इ. माहिती प्रसारीत करण्यात येते. प्रत्येक केंद्रावरील प्रशिक्षणांर्थींच्या आसनसंख्या मर्यादेमध्ये फरक असू शकतो.
प्रशिक्षणाचे स्वरुप व विवरण पुढीलप्रमाणे:
कालावधी: १०+१ (दहा दिवस प्रशिक्षण आणि अकराव्या दिवशी परीक्षा).
वेळ: २ ते ४ तास
शुल्क:: विद्यार्थ्यांसाठी ₹३०० आणि इतरांसाठी (शिक्षक, प्राध्यापक इ.) ₹६००
महत्त्वाचे: प्रशिक्षणार्थींनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी जाताना सोबत स्वत:चे दोन फोटो, छायांकित ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड,वाहन परवाना इ.) घेऊन जावे.
अधिक माहितीकरता संपर्क साधावा:
पुराभिलेख संचालनालय, मुंबई (मुख्य कार्यालय)
१५६, कावसजी जहांगीर रेडीमनी इमारत, महात्मा गांधी मार्ग,
काळा घोडा, फोर्ट, मुंबई ४०००३२.
फोन: 022 22844268 / 022 22843971
इमेल :- mumbaiarchives@gmail.com
गुगल पिन: https://maps.app.goo.gl/dynuuMtsDmm63u4f6
मोडी लिपी ही मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन व संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिपी आहे. इतिहास जपण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी आणि मराठीच्या सांस्कृतिक वारशाशी नातं घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. इतिहास जतनासाठी, मोडी लिपी अवश्य शिका.
******************************************A large number of important historical records in the Modi script are preserved in government offices across Maharashtra. In line with Resolution No. 7 of the 46th Session of the Indian Historical Records Committee (IHRC), New Delhi, and to develop skilled readers of such historical records, the Directorate of Archives has launched a permanent initiative to conduct Modi Script Training Camps. As per the Government Resolution dated 29th July 2024, a maximum of seven training camps will be organised every financial year, with one camp per revenue division in the following regions: Nagpur, Amravati, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Pune, Konkan 1, and Konkan 2.
These training sessions are conducted in person (not online). Once the schedule is finalised, details such as the venue and address of the training centres in the respective regions are published publicly. The number of seats available at each centre may vary depending on local capacity.
The nature and details of the training are as follows:
Duration: 10+1 (ten days of training and examination on the eleventh day).
Time: 2 to 4 hours
Fee: ₹300 for students and ₹600 for others (teachers, professors etc.)
Important: Trainees should carry two self-photographed photographs, ID proof (Aadhaar card, PAN card, driving license etc.) while filling the admission form.
For more information, contact:
Directorate of Archives, Mumbai (Head Office)
156, Kawasji Jehangir Readymani Building, Mahatma Gandhi Marg,
Kala Ghoda, Fort, Mumbai 400032.
Phone: 022 22844268 / 022 22843971
Email:- mumbaiarchives@gmail.com
TGoogle Pin: https://maps.app.goo.gl/dynuuMtsDmm63u4f6
The Modi script is an essential key to reading and researching historical documents in Marathi. It serves as a bridge to understanding authentic evidence and strengthens our connection to Maharashtra’s cultural heritage. To preserve history—learn Modi script today.