मोडी लिपी प्रशिक्षण - पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात मोडी लिपीतील महत्वाचे अभिलेख आहेत. सदर अभिलेख वाचण्यासाठी वाचक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच भारतीय ऐतिहासिक कागदपत्र आयोग, नवी दिल्ली यांच्या ४६ व्या अधिवेशनातील ठराव क्रमांक ७ नुसार पुराभिलेख संचालनालयामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग योजना कायमस्वरुपी राबविण्यासाठी दि.२९ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयान्वये नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण १ व कोकण २ ह्या सात महसूली विभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ७ प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रशिक्षण प्रत्यक्ष घेतले जाते, ऑनलाईन नाही . प्रशिक्षण आयोजित करण्याचा दिनांक निश्चित झाला की उपरोल्लेखित सात विभागांमधील केंद्रांचे स्थळ, पत्ता इ. माहिती प्रसारीत करण्यात येते. प्रत्येक केंद्रावरील प्रशिक्षणांर्थींच्या आसनसंख्या मर्यादेमध्ये फरक असू शकतो. प्रशिक्षणाचे स्वरुप व विवरण पुढीलप्रमाणे: कालावधी: १०+१ (दहा दिवस प्रशिक्षण आणि अकराव्या दिवशी परीक्षा). वेळ: २ ते ४ तास शुल्क:: विद्यार्थ्यांसाठ...