मोडी अभ्यासकांसाठी उपयुक्त संकेतस्थळ
मोडी लिपी अस्खलिखतपणे वाचता यावी ह्यासाठी त्या लिपीतील कागदपत्रे दररोज वाचण्याचा सराव असावा लागतो. पुराभिलेखागारातील प्राचीन मोडी कागदपत्रेदेखील वरचेवर वाचनासाठी उपलब्ध करून देता येत नाहीत. मात्र आता मोडीप्रेमींना निराश होण्याचे कारण नाही. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे ह्या संस्थेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडे संशोधन मंडळाकडे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक मोडी कागदपत्रांचा संग्रह डिजिटाइझ्ड करून ते कागदपत्र VKRajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे ही कागदपत्रे डाऊनलोड करून घेण्यासाठी देखील उपलब्ध आहेत.
ह्या ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांमध्ये मोडी पत्रांसोबत बखरी, शकावली अशी वर्गवारी केलेली आहे. सर्व कागदपत्रे सुस्पष्ट व मोठ्या आकाराच्या प्रतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाचण्यास अडचण येत नाही. ह्या संकेतस्थळावर संस्कृत, मराठी व हिंदी भाषेतील कागपत्रांसोबतच फारसी कागदपत्रांचादेखील समावेश करण्यात आला आहे. इतिहासप्रेमींनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा.