मोडी लिप्यंतर कौशल्य १
मोडी लेखन तारतम्याने वाचायचं म्हणजे काय?
पहिलं चित्र पहा. हा शब्द ’माझी’ असा मोडीत लिहिलेला आहे हे सांगूनही पटणार नाही कारण मोडीतलं ’झ’ हे अक्षर ’कर’ सदृश दिसतंय आणि पुढील पूर्ण वेलांटी म्हणजे ’नी’ हे अक्षर वाटतंय.
’झ’ अक्षराच्या पोटातून सुरू होणारा काना व वेलांटी अक्षराच्या शेपटाकडून सुरू होतेय. गोंधळ उडणं साहजिक आहे.
वाचनाची सवय नसेल तर हा शब्द ’माकरनी’ असा वाचला जाईल. आता दुसरं चित्र पहा. पहिल्या चित्रातील शब्दाच्या पुढचे दोन शब्द नीट वाचता येत आहेत - ’वलार्जित मिळकत’.
एकदा हे दोन शब्द कळले कि पहिला जो शब्द ’माकरनी’ असा वाचला तो ’माझी’ आहे हे चटकन कळून येतं.
आता तिन्ही शब्द सलग वाचले तर ’माझी वडिलार्जित मिळकत’ असं वाचता येतं.