me

रूपये व्याज सुद्धा मोडी लेखन पद्धती

रूपये व्याज सुध्धा ( रूपये व्याज सुद्धा )

लिहिण्याची पद्धत पहा.

"ये" अक्षरामधील मात्रा वरच थांबविता आली असती पण ती पुन्हा वळवून शिरोरेघेवर आणून थांबवली आहे. इतकंच नव्हे तर "व्याज" शब्द लिहिताना मोडी ’व’ ला देवनागरीसम "या"जोडला आहे पण तो देवनागरी "पा" सारखा दिसतोय.


त्यातच ’रूपये’ शब्दामधील ’ये’ची खाली वळवलेली मात्रा "व्या" च्या शिरोरेघेवर येऊन विसावल्याने तो शब्द ’व्याज’ ऐवजी निराळाच असल्याचा भास निर्माण होतो. जर आधीचे व नंतरचे शब्द माहित नसतील तर संदर्भाने वाचन करणं अशक्य होऊन गोंधळ उडू शकतो.

ह्या व्यतिरिक्त ह्या लेखनात आणखी ३ वैशिष्ट्ये दिसताहेत, ती कुणी सांगू शकेल का?

No comments:

Post a Comment

Testimonials