मोडी लेखन पद्धती २
विचार करून मेंदूचा भुगा पडला पण हा शब्द काही केल्या कळेना. 😥 पूर्ण कागदात सगळीकडे हा शब्द होता पण त्या माणसाने नेमकं काय गहाण ठेवलंय हे लक्षातच येत नव्हतं. नंतर एका ठिकाणी ’शिंगे’ असा शब्द वाचल्यावर कळलं कि तो न कळलेला शब्द ’टोणगा’ असा आहे.
हा शब्द लिहिलाय कसा बघा - टाणगो. पहिल्या अक्षरावरची मात्रा थेट तिसऱ्या अक्षरावर. मग आपण आपल्या मनाने विचार करू लागतो आणि शब्दच्छल होतात. म्हणून एखादा शब्द नाही लागला तो दुसऱ्या कागदावर लिहून ठेवा किंवा हायलाईट करा. त्याचा संदर्भ कागदात पुढे मागे नक्की सापडतो.
कागदात टोणग्याची "शिंगे" दिसली नसती तर हा शब्द कळणं अवघड होतं. 😄
कागदात टोणग्याची "शिंगे" दिसली नसती तर हा शब्द कळणं अवघड होतं. 😄