तंजावरी पत्रांमधील 'ब' आणि 'बा'
तंजाऊर येथील अनेक मोडी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या उच्चारांसाठी एकच अक्षर वापरले जाते असे आढळून आले आहे. हे अक्षर प्रचलित मोडी 'ब' अक्षरासारखेच दिसते. मात्र अक्षराचा काना जेथे शिरोरेघेला स्पर्श करून संपतो तेथे आतल्या बाजूस एक लहानसा वक्राकार देऊन देवनागरी 'प'सदृश आकार तयार केला जातो. आजवर प्रसिद्ध झालेल्या बऱ्याच तंजावरी पत्रांमध्ये ब आणि बा ह्या दोन्ही उच्चारांसाठी अश्या प्रकारचे अक्षर लिहिल्याचे आढळून आले आहे.

