अंकी रक्कम
सर्वसाधारणपणे, करारपत्र किंवा धनादेशात रकमेचे अंक आधी लिहिले जातात आणि त्यानंतर तेच आकडे अक्षरांमध्ये लिहून अंकात लिहिलेली रक्कम योग्य असल्याबद्दल पुष्टीकरण केलं जातं. त्यासाठी ‘अक्षरी’ हा शब्द वापरून मगच पुढे अक्षरी रक्कम लिहिली जाते.
पण ह्या मोडी दस्तऐवजात मात्र नेमका उलट प्रकार केलेला आहे.आधी रकमेचे आकडे अक्षरांमध्ये लिहिले आहेत आणि मग ‘अंकी’ असं लिहून रकम अंकांमध्ये लिहिली आहे.