विकृत कि विक्रीत?
संदर्भाने वाचन करणे योग्य कसे ठरते हे दाखवणारा आणखी एक नमुना. लाल चौकटीने दर्शविलेलं हे मोडी अक्षर आहे ‘कृ’. प्रत्यक्ष शब्द ‘विक्रीत’ असा आहे. त्यामुळे ‘क्री’ ह्या अक्षरासाठी ‘ ’ अश्या प्रकारे मोडीत लिहिले जाणे अपेक्षित आहे. पण एक-दोन अपवाद वगळता सर्वच मोडी लेखनिक ‘क्री’ लिहिताना लाल चौकटीत दर्शविल्याप्रमाणे लिहितात. मोडी वाचकाने हे लक्षात ठेवायचं आहे कि वाचन व लिप्यंतर करताना ह्या अक्षराचं लिप्यंतर क्री असंच करायचं आहे. अन्यथा शब्दाचा अर्थ विक्रीत ऐवजी विकृत असा होईल.