अटके गावचे शेतकरी बंधू मोडी शिकले
आज साताऱ्यातील अटके गावच्या एका शेतकरी बंधूंनी पत्र पाठवलं आहे. Modi Script Online ह्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून ते एका महिनाभऱ्यात मोडी लिहायला शिकले. अक्षरांचा सराव केल्यावर त्यांनी घरातील व्यक्तींची नावे, भाज्यांची नावे, वर्तमानपत्रातील ओळी लिहिण्याचा सरावदेखील केला.
त्यांच्या लेखनात काही त्रुटी अवश्य आहेत पण सात-आठ ओळींचं एक पत्र लिहिण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला. त्यांच्या पत्राचं सर्वांना वाचण्यायोग्य असं देवनागरी लिप्यंतर सोबत देत आहे.
ज्याप्रकारे मन लावून ते अभ्यास करत आहेत ते पाहता येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडील जुने दस्तऐवज वाचण्याइतके तरबेज ते नक्कीच होतील. मोडी लिपीच्या अभ्यासाकरीता त्यांना भरभरून शुभेच्छा! 🌹