मोडी लिपी समज आणि गैरसमज
मोडी लिपी महाराष्ट्रातील प्रत्येकाला अवगत नसली तरी सर्वांच्या परिचयाची नक्कीच आहे. ज्यांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण घेतलेले नाही अश्या व्यक्तिंसोबतच मोडी लिपीचा नुकताच अभ्यास सुरू केलेल्या विद्यार्थ्यांना ह्या लिपीबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्या उस्तुकततेमधून अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. त्यातील सत्यासत्यता पारखून घेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न: १. मोडी ही भाषा आहे. वास्तव: मोडी ही भाषा नसून लिपी आहे . ज्याप्रमाणे आजच्या काळात आपण मराठी किंवा हिंदी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर करतो किंवा मोबाईलवर संदेश टंकलिखित करताना क्वचित प्रसंगी रोमन लिपीचा वापर करून "इंग्रजीतून मराठी" लिहितो, त्याचप्रमाणे आधी मोडी लिपीचा वापर केला जात असे.