Posts

Showing posts with the label MahaModiArch

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

मोडी अभ्यासकांसाठी उपयुक्त संकेतस्थळ

Image
मोडी लिपी अस्खलिखतपणे वाचता यावी ह्यासाठी त्या लिपीतील कागदपत्रे दररोज वाचण्याचा सराव असावा लागतो. पुराभिलेखागारातील प्राचीन मोडी कागदपत्रेदेखील वरचेवर वाचनासाठी उपलब्ध करून देता येत नाहीत. मात्र आता मोडीप्रेमींना निराश होण्याचे कारण नाही. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे ह्या संस्थेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडे संशोधन मंडळाकडे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक मोडी कागदपत्रांचा संग्रह डिजिटाइझ्ड करून ते कागदपत्र VKRajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे ही कागदपत्रे डाऊनलोड करून घेण्यासाठी देखील उपलब्ध आहेत.

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारताच्या व विशेषतः मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था. तिची स्थापना ७ जुलै १९१० रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी केली. येथे १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,०००हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत.भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.

Five main branches of Directorate of Archives in Maharashtra

पुराभिलेख संचालनालयाच्या महाराष्ट्रातील पाच मुख्य शाखा: मुंबई Mumbai Archive Department Address: 156, Sir, Cowasjee Jahangir Readymoney Building, Mahatma Gandhi Road, Kala Ghoda, Fort, Mumbai – 400 032 Phone: 02222844268 Phone: 02222843971 Email: directorarchives@gmail.com