Posts

कुणबी हा शब्द मोडी कागदपत्रांमध्ये कसा शोधावा?

Image
‘कुणबी हा शब्द आमच्या कागदपत्रांतून शोधून द्या’ अशी विचारणा वारंवार फोन, WhatsApp वर होत आहे. केवळ एका शब्द शोधून काढण्यासाठी एकाच व्यक्तीचे १०-१५ कागद वेळेअभावी पहाणे शक्य होत नाही आणि गरवंतांना आपण वेळेवर मदत करु शकत नाही ह्याचंही वाईट वाटतं. म्हणून ही अल्पशी मदत आपल्या कागदपत्रांमधून हा शब्द शोधून काढायचा असतो त्यांच्यासाठी. सोबतच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्रत्यक्ष मोडी कागदपत्रांमधील ‘कुणबी’ हा शब्द कसा दिसतो ते चार वेळा दाखवले आहे. त्यावरुन आपल्या कागदपत्रांमध्ये ह्या शब्दाचा शोध घेता येईल. हा शोध सोपा व्हावा म्हणून आणखी एक टीप: कागदपत्रांमध्ये शक्यतो व्यक्तींची नावे जिथे लिहिलेली असतात तिथेच पुढे त्या व्यक्तीच्या जातीचा, वयाचा व व्यवसाय/नोकरीचा उल्लेख केलेला असतो. ह्याचसोबत आणखी एक सल्ला द्यावासा वाटतो की घरात खूप मोडी कागदपत्रे असतील तर स्वत: मोडी शिका आणि ते कागद वाचण्याचा प्रयत्न करा. नक्की जमेल.

काय असेल हा शब्द?

Image
आधीच मोडी ही भरभर लिहिता येण्यासाठी तयार केलेली लिपी आहे. त्यात स्वत:च्या शैलीमुळे लेखनिक नवीन वाचकांसाठी एक-एक आव्हानच उभं करत असतात. पहिल्या वाचनात हा शब्द ‘पचजाग’ असा वाचला जाईल. अगदीच संशयाला वाव नको म्हणून ‘पचनाग, पचफग’ असंही वाचन केलं जाईल. पण मूळ मोडी शब्द आहे - पच्याग. पंचांग हा शब्द पंच्यांग असा लिहिण्याच्या प्रयत्नात लेखनिकांनी शब्दातले दोन अनुस्वार वगळले आहेतच पण ‘या’ ह्या अक्षराचं रुप किती बदललं आहे पहा. मोडीचा अभ्यास करताना शिकलेली अक्षरं आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधील अक्षरांमध्ये काय फरक असतो हे वाचनाचा सराव करतानाच कळतं.

व्यावसायिक नीतीमूल्ये ३

Image
टिका आणि प्रशंस्था तटस्थपणे स्वीकारा आपली कुवत आणि आपल्या मर्यादा आपल्याला चांगल्याच ठाऊक असतात. त्यामुळे कोणी आपली स्तुती अगर किंवा टिका करत असेल तर त्यांच्या विधानांमध्ये किती सत्यता आहे ह्याचा तटस्थपणे विचार करा. ही प्रशंसा अथवा टिका करण्यामागे त्यांच्या काय हेतू असू शकेल हे ओळखण्याचा प्रयत्न करा. स्तुती करणारा प्रत्येक जण तुमचा हितचिंतक नसतो आणि टीका करणारा प्रत्येक जण तुमचा शत्रू नसतो.

व्यावसायिक नीतीमूल्ये २

Image
टिका आपले सम व्यावसायिक किंवा आपले सहकारी ह्यांच्या विरोधात बोलणे टाळा.  काही वेळा क्लायंट्स/गिऱ्हाईक एकाकडून करुन घेतलेलं काम दुसऱ्याकडून पुन्हा करवून घेतात. दुसऱ्यांदा काम करुन देताना ‘आधीच्या माणसाने काम नीट करुन दिलं नाही’ असं सर्वसाधारणपणे सांगितलं जातं. सोबत आधीच्या माणसाबद्दल चार टिकेचे शब्द जोडले जातात. अश्या टिकेमध्ये आपला सहभाग देणे टाळा. क्लायंट/गिऱ्हाईकाने दुसऱ्यांदा काम करुन घेण्यामागचं खरं कारण आपल्याला माहित असतंच असं नाही. आज दुसऱ्याचं काम जसं तुमच्याकडे आलं आहे, तसंच तुमचंही काम दुसऱ्याकडे जात असण्याची  शक्यता आहे.  दुसऱ्यावर टिका केल्यामुळे आपल्या कामाचा परफॉर्मन्स वाढणार नसतो. त्याऐवजी पूर्वी करुन दिलेल्या कामात काही त्रुटी आढळल्याच तर त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया न देता, त्या दूर करुन काम जास्तीत जास्त निर्दोष करुन देण्याकडे कल ठेवा.

व्यावसायिक नीतीमूल्ये १

Image
गोपनियता