Posts

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

कुणबी नोंदींचे मराठी भाषांतर (देवनागरी लिप्यंतर)

Image
ठाणे जिल्ह्यातील १४ गांवांमधील कुणबी नोंदींचे लिप्यंतर केले. इतर जिल्ह्यांमधील गावांच्या कुणबी नोंदीचे कामदेखील सुरू आहे.

अटके गावचे शेतकरी बंधू मोडी शिकले

Image
आज साताऱ्यातील अटके गावच्या एका शेतकरी बंधूंनी पत्र पाठवलं आहे. Modi Script Online ह्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून ते एका महिनाभऱ्यात मोडी लिहायला शिकले. अक्षरांचा सराव केल्यावर त्यांनी घरातील व्यक्तींची नावे, भाज्यांची नावे, वर्तमानपत्रातील ओळी लिहिण्याचा सरावदेखील केला. त्यांच्या लेखनात काही त्रुटी अवश्य आहेत पण सात-आठ ओळींचं एक पत्र लिहिण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला. त्यांच्या पत्राचं सर्वांना वाचण्यायोग्य असं देवनागरी लिप्यंतर सोबत देत आहे. ज्याप्रकारे मन लावून ते अभ्यास करत आहेत ते पाहता येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडील जुने दस्तऐवज वाचण्याइतके तरबेज ते नक्कीच होतील. मोडी लिपीच्या अभ्यासाकरीता त्यांना भरभरून शुभेच्छा! 🌹

Kunbi Maratha Records Translation at reasonable price

Image
माझ्याकडे सध्या मोडी लिपीत असलेल्या कुणबी-मराठा नोंदी तपासून त्यांचे लिप्यंतर करण्याचे काम सुरू आहे. ह्या कामासाठी कमीत कमी शुल्क आकारुन केले जात आहे. जर कोणाला आपले नोंदणी बुक देवनागरी मराठीमध्ये भाषांतर (लिप्यंतर) करून हवे असेल तर सर्वप्रथम PDF तयार करा आणि मला Whatsapp वर पाठवा. PDF कशी तयार करायची इ. सर्व माहिती वर दिलेली आहे.

शुभ दीपावली २०२३

Image
आमच्या सर्व क्लायंट्सना, मित्र-मैत्रीणी, हितचिंतक आणि सहयोगी व्यावसायिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

कुणबी हा शब्द मोडी कागदपत्रांमध्ये कसा शोधावा?

Image
‘कुणबी हा शब्द आमच्या कागदपत्रांतून शोधून द्या’ अशी विचारणा वारंवार फोन, WhatsApp वर होत आहे. केवळ एका शब्द शोधून काढण्यासाठी एकाच व्यक्तीचे १०-१५ कागद वेळेअभावी पहाणे शक्य होत नाही आणि गरवंतांना आपण वेळेवर मदत करु शकत नाही ह्याचंही वाईट वाटतं. म्हणून ही अल्पशी मदत आपल्या कागदपत्रांमधून हा शब्द शोधून काढायचा असतो त्यांच्यासाठी. सोबतच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्रत्यक्ष मोडी कागदपत्रांमधील ‘कुणबी’ हा शब्द कसा दिसतो ते चार वेळा दाखवले आहे. त्यावरुन आपल्या कागदपत्रांमध्ये ह्या शब्दाचा शोध घेता येईल. हा शोध सोपा व्हावा म्हणून आणखी एक टीप: कागदपत्रांमध्ये शक्यतो व्यक्तींची नावे जिथे लिहिलेली असतात तिथेच पुढे त्या व्यक्तीच्या जातीचा, वयाचा व व्यवसाय/नोकरीचा उल्लेख केलेला असतो. ह्याचसोबत आणखी एक सल्ला द्यावासा वाटतो की घरात खूप मोडी कागदपत्रे असतील तर स्वत: मोडी शिका आणि ते कागद वाचण्याचा प्रयत्न करा. नक्की जमेल.