Posts

कुणबी हा शब्द मोडी कागदपत्रांमध्ये कसा शोधावा?

Image
‘कुणबी हा शब्द आमच्या कागदपत्रांतून शोधून द्या’ अशी विचारणा वारंवार फोन, WhatsApp वर होत आहे. केवळ एका शब्द शोधून काढण्यासाठी एकाच व्यक्तीचे १०-१५ कागद वेळेअभावी पहाणे शक्य होत नाही आणि गरवंतांना आपण वेळेवर मदत करु शकत नाही ह्याचंही वाईट वाटतं. म्हणून ही अल्पशी मदत आपल्या कागदपत्रांमधून हा शब्द शोधून काढायचा असतो त्यांच्यासाठी. सोबतच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्रत्यक्ष मोडी कागदपत्रांमधील ‘कुणबी’ हा शब्द कसा दिसतो ते चार वेळा दाखवले आहे. त्यावरुन आपल्या कागदपत्रांमध्ये ह्या शब्दाचा शोध घेता येईल. हा शोध सोपा व्हावा म्हणून आणखी एक टीप: कागदपत्रांमध्ये शक्यतो व्यक्तींची नावे जिथे लिहिलेली असतात तिथेच पुढे त्या व्यक्तीच्या जातीचा, वयाचा व व्यवसाय/नोकरीचा उल्लेख केलेला असतो. ह्याचसोबत आणखी एक सल्ला द्यावासा वाटतो की घरात खूप मोडी कागदपत्रे असतील तर स्वत: मोडी शिका आणि ते कागद वाचण्याचा प्रयत्न करा. नक्की जमेल.

काय असेल हा शब्द?

Image
आधीच मोडी ही भरभर लिहिता येण्यासाठी तयार केलेली लिपी आहे. त्यात स्वत:च्या शैलीमुळे लेखनिक नवीन वाचकांसाठी एक-एक आव्हानच उभं करत असतात. पहिल्या वाचनात हा शब्द ‘पचजाग’ असा वाचला जाईल. अगदीच संशयाला वाव नको म्हणून ‘पचनाग, पचफग’ असंही वाचन केलं जाईल. पण मूळ मोडी शब्द आहे - पच्याग. पंचांग हा शब्द पंच्यांग असा लिहिण्याच्या प्रयत्नात लेखनिकांनी शब्दातले दोन अनुस्वार वगळले आहेतच पण ‘या’ ह्या अक्षराचं रुप किती बदललं आहे पहा. मोडीचा अभ्यास करताना शिकलेली अक्षरं आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधील अक्षरांमध्ये काय फरक असतो हे वाचनाचा सराव करतानाच कळतं.

विकृत कि विक्रीत?

Image
संदर्भाने वाचन करणे योग्य कसे ठरते हे दाखवणारा आणखी एक नमुना.  लाल चौकटीने दर्शविलेलं हे मोडी अक्षर आहे ‘कृ’. प्रत्यक्ष शब्द ‘विक्रीत’ असा आहे . त्यामुळे ‘क्री’ ह्या अक्षरासाठी  ‘  ’ अश्या प्रकारे मोडीत लिहिले जाणे अपेक्षित आहे. पण एक-दोन अपवाद वगळता सर्वच मोडी लेखनिक ‘क्री’ लिहिताना लाल चौकटीत दर्शविल्याप्रमाणे लिहितात. मोडी वाचकाने हे लक्षात ठेवायचं आहे कि वाचन व लिप्यंतर करताना ह्या अक्षराचं लिप्यंतर क्री असंच करायचं आहे . अन्यथा शब्दाचा अर्थ विक्रीत ऐवजी विकृत असा होईल. 

हे काय लिहिलेले आहे?

Image
हे काय लिहिलेले असावे? पावगी पटा ग्वाले नंबर? कि आणखी काही?

जुन्या कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन

प्राचीन हस्तलिखितांचे किंवा घरातील जुन्या कागदपत्रांचे जतन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कितीही सांभाळली तरी काळाचा प्रभाव कागदासारख्या नाशिवंत वस्तूवर होणार हे नक्की! आपल्या भावी पिढ्यांसाठी ही जुनी कागदपत्रे इतिहासाचे साक्षीदार म्हणून जपून ठेवायची असतील तर सर्वप्रथम ह्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी करणे अनिवार्य आहे. स्कॅनिंग: चांगल्या ऑफिस स्कॅनरवर किंवा झेरॉक्सवाल्यांकडे कागदपत्रे स्कॅन करून मिळतात. हल्ली स्मार्टफोनकरीता देखील स्कॅनिंगची अ‍ॅप्स उपलब्ध आहेत; पण त्याचे काही तोटे आहेत. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे MP जितके असतात तितकीच क्षमता स्कॅनिंग अ‍ॅपची असते हे लक्षात असू द्या. स्मार्टफोनवर फोटो किंवा स्कॅनिंग करताना हात थरथरला तर त्याच्या परिणाम म्हणून फोटो/इमेज निकृष्ट दर्जाच्या येतात. तसेच, स्कॅनिंग करण्यासाठी फोन कोणत्या कोनात, दिशेत धरावा ह्याचे योग्य ज्ञान नसल्यास चुकीच्या पद्धतीने काढलेले फोटो किंवा इमेजेस निरुपयोगी ठरतात म्हणून झेरॉक्सवाल्यांकडून स्कॅन करून घेणे उपयुक्त किंवा साध्या स्कॅनरचा वापर करण्याइतपत कागदपत्रे लहान आकाराची नसतील तर पुराभिलेखागारांकडे मोठे स्कॅनर्स...