प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद
Read in Hindi
मोडी लिपी शिकत असताना लेखनाचा सराव करते वेळेस अक्षरांची वळणं प्रमाणबद्ध असावीत, अक्षर सुंदर नसलं तरी सुवाच्य असावं ह्याकडे आपण लक्ष पुरवतो. बोरू किंवा कट् निबच्या लेखणीने लेखन करतो. पण ऐतिहासिक कागदपत्रांमधील अक्षर नीट न्याहाळलं तर आपला मोडी लेखनाचा सराव आणि त्या कागदपत्रांमधील अक्षरांची वळणं ह्यात अंतर असल्याचं दिसून येतं.
खालच्या चित्रामधील लेखन पहा:
'मौजे' हा पूर्ण शब्द, मजकूर शब्दामधील ’कु’ अक्षर आणि सन शब्दामधील ’न’ अक्षराला जोडून लिहिलेला १ हा अंक.
कागदपत्रात मागे-पुढे गावाचं नाव, हिंदू किंवा इसवी दिनांक असे संदर्भ देखील उपलब्ध असले तर घाईघाईत लिहिलेल्या लेखनाचंही चटकन आकलन होतं. पण केवळ इतकीच ओळ अक्षर-ओळखीसाठी समोर आली तर आपण सराव करत असलेल्या मोडी अक्षरांची वळणांच्या तुलनेत वरच्या ओळीमधील शब्दांची वळणे भिन्न असल्यामुळे अक्षर ओळखण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे वरील शब्दांचे भिन्न लिप्यंतर आणि अनुवाद होऊ शकतो. क्वचित प्रसंगी अंकदेखील अक्षर असल्याचा भास होऊ शकतो. लेखन वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात येते कि लेखनिकाचं मूळ अक्षर सुंदर आहे. मात्र मोडी लेखन करताना लपेटीयुक्त लेखनपद्धतीमुळे हाताला गती मिळते आणि त्या गतीशी समतोल राखताना अक्षरांच्या वळणांमध्ये परिवर्तन होत गेलं आहे.