Posts

जुन्या कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन

प्राचीन हस्तलिखितांचे किंवा घरातील जुन्या कागदपत्रांचे जतन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कितीही सांभाळली तरी काळाचा प्रभाव कागदासारख्या नाशिवंत वस्तूवर होणार हे नक्की! आपल्या भावी पिढ्यांसाठी ही जुनी कागदपत्रे इतिहासाचे साक्षीदार म्हणून जपून ठेवायची असतील तर सर्वप्रथम ह्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी करणे अनिवार्य आहे. स्कॅनिंग: चांगल्या ऑफिस स्कॅनरवर किंवा झेरॉक्सवाल्यांकडे कागदपत्रे स्कॅन करून मिळतात. हल्ली स्मार्टफोनकरीता देखील स्कॅनिंगची अ‍ॅप्स उपलब्ध आहेत; पण त्याचे काही तोटे आहेत. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे MP जितके असतात तितकीच क्षमता स्कॅनिंग अ‍ॅपची असते हे लक्षात असू द्या. स्मार्टफोनवर फोटो किंवा स्कॅनिंग करताना हात थरथरला तर त्याच्या परिणाम म्हणून फोटो/इमेज निकृष्ट दर्जाच्या येतात. तसेच, स्कॅनिंग करण्यासाठी फोन कोणत्या कोनात, दिशेत धरावा ह्याचे योग्य ज्ञान नसल्यास चुकीच्या पद्धतीने काढलेले फोटो किंवा इमेजेस निरुपयोगी ठरतात म्हणून झेरॉक्सवाल्यांकडून स्कॅन करून घेणे उपयुक्त किंवा साध्या स्कॅनरचा वापर करण्याइतपत कागदपत्रे लहान आकाराची नसतील तर पुराभिलेखागारांकडे मोठे स्कॅनर्स...

अंकी रक्कम

Image
सर्वसाधारणपणे, करारपत्र किंवा धनादेशात रकमेचे अंक आधी लिहिले जातात आणि त्यानंतर तेच आकडे अक्षरांमध्ये लिहून अंकात लिहिलेली रक्कम योग्य असल्याबद्दल पुष्टीकरण केलं जातं. त्यासाठी ‘अक्षरी’ हा शब्द वापरून मगच पुढे अक्षरी रक्कम लिहिली जाते. पण ह्या मोडी दस्तऐवजात मात्र नेमका उलट प्रकार केलेला आहे.आधी रकमेचे आकडे अक्षरांमध्ये लिहिले आहेत आणि मग ‘अंकी’ असं लिहून रकम अंकांमध्ये लिहिली आहे.

मोडी लिपी सराव वही - जून २०१४

Image
मोडी लिपी शिकताना आरंभी भरपूर लेखन सरावाची आवश्यकता असते. आज हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने माझ्या सराव वहीचा हा व्हिडिओ.

योगायोग

Image
लिप्यंतरासाठी येणाऱ्या दस्तऐवजांमध्ये कधी-कधी असे योगायोगदेखील आढळतात. आज ख्रिस्ती दिनर्शिकेनुसार तारीख आहे २१ जानेवारी २०२२ आणि हा दस्तऐवजदेखील २१ जानेवारीलाच लिहिला गेला होता. आज ह्या दस्तऐवजाला बरोबर ९७ वर्षे पूर्ण झाली.

काप दापोली

Image
‘काप दापोली’ असा उल्लेख मोडी कागदपत्रांमधून आढळतो. काप दापोली म्हणजे कॅम्प दापोली. ब्रिटिशांनी दापोली येथे जे लष्करी ठाणे वसवले त्याला कॅम्प दापोली म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे काप दापोली.