me

मोडी लिपी दूरस्थ प्रशिक्षण वर्ग

मोडी लिपी सर्वांना ऐकून माहित असली तरी कित्येकांना ती शिकण्याची आवड असूनही त्यांच्या विभागात तशी सुविधा नसल्याने ते मोडी लिपी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. तसेच भारताबाहेरूनदेखील काही व्यक्तिंनी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाची विचारणा केली आहे. अश्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मी स्वत: मोडी लिपी दूरस्थ प्रशिक्षण देण्याची तयारी करीत आहे. हे वर्ग अश्या प्रकारचे असतील कि आपण भारतात किंवा भारताबाहेर कुठेही असलात तरीही ह्या प्रशिक्षण वर्गाचा फायदा आपल्याला घेता येईल. सदर वर्ग हे अर्थातच सशुल्क असणार आहेत.

ह्या कामी मला आपल्याकडून माहिती आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या प्राधान्यतेनुसार प्रशिक्षण देता येईल. कृपया खाली दिलेला ऑनलाईन अर्ज भरून पाठवल्यास त्या माहितीच्या आधारे आपल्यासाठी जो वर्ग उपयुक्त असेल त्या वर्गाची सविस्तर माहिती आपल्याला देता येईल.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग प्रवेश अर्ज

No comments:

Post a comment