काय असेल हा शब्द?
आधीच मोडी ही भरभर लिहिता येण्यासाठी तयार केलेली लिपी आहे. त्यात स्वत:च्या शैलीमुळे लेखनिक नवीन वाचकांसाठी एक-एक आव्हानच उभं करत असतात. पहिल्या वाचनात हा शब्द ‘पचजाग’ असा वाचला जाईल. अगदीच संशयाला वाव नको म्हणून ‘पचनाग, पचफग’ असंही वाचन केलं जाईल. पण मूळ मोडी शब्द आहे - पच्याग. पंचांग हा शब्द पंच्यांग असा लिहिण्याच्या प्रयत्नात लेखनिकांनी शब्दातले दोन अनुस्वार वगळले आहेतच पण ‘या’ ह्या अक्षराचं रुप किती बदललं आहे पहा. मोडीचा अभ्यास करताना शिकलेली अक्षरं आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधील अक्षरांमध्ये काय फरक असतो हे वाचनाचा सराव करतानाच कळतं.