मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

दोन अपरिचित शब्द

हे दोन शब्द नेहमीच्या मोडी दस्तऐवजांमध्ये क्वचितच आढळतात. त्यातच जर मोडी लेखन गुंतागुंतीचे असेल तर योग्य शब्द कळूनदेखील त्यांची खात्री वाटत नाही.

कधी, कधी अशी परिस्थिती असते कि लेखन अतिशय किचकट असतं आणि ह्या दोन शब्दांशिवाय काहीच वाचता येत नाही. पण हे नवीन कळलेले दोन शब्दच संपूर्ण वाक्याचा अर्थ उलगडायला मदत करतात.


पंचत्व म्हणजे मृत्यू आणि कुणफ म्हणजे मृतदेह.

अश्या परिस्थितीत मोडी लिप्यंतरकाराचा शब्दसंग्रह पक्का असावा लागतो. शब्दकोशांची गरज लागते ती अशाच प्रसंगी.