me

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद २

’राजीखुषीने’ म्हणजे स्वेच्छेने.

हिंदी में यहॉं पढिए ।

शब्द एकच पण प्रत्येक कागदपत्रामध्ये निरनिराळ्या लेखनिकाचे हस्ताक्षर, लेखनाची गती आणि लेखन साधनांतील वैविध्यामुळे ह्या शब्दामध्येही विविधता दिसून येत आहे.

ह्या तीन गोष्टींसोबतच आणखी दोन गोष्टी ह्या विविधतेला कारणीभूत आहेत, त्या म्हणजे शब्दांवर असलेला बोलीभाषेचा प्रभाव. ’श’ चा उच्चार ’स’ प्रमाणे किंवा ह्याच्या उलट उच्चार करणे अगदी सहज घडू शकते आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे, लेखनाकरीता मूळ शब्दामध्ये करून घेतलेले सोयिस्कर बदल. उदाहरणार्थ, अनेक पेशवेकालीन पत्रांमध्ये आपण ’बल्लाळ’ हे आडनाव ’बलाल’ असे लिहिलेले वाचले आहे. ह्याचा अर्थ त्या काळी लेखनिकाला योग्य शब्द माहित नव्हता असे नाही. पेशव्यांच्या राजमुद्रेमध्ये तर ’बल्लाळ’ असे देवनागरीत स्पष्ट लिहिलेलेच असते पण मोडीमधून लेखन करताना ’बलाल’ शब्द लिहिताना जितक्या सहजतेने लिहिला जातो तितकी सहजता ’बल्लाळ’ असा शब्द लिहिताना येत नाही.

अगदी ह्याचप्रमाणे खालील चित्रामध्ये असलेला ’राजीखुषीने’ हा शब्द राजीखुसीने, राजीखुषीने, राजीखुशीने असा निरनिराळ्या प्रकारे लिहिलेला आढळतो.

मात्र ह्या शब्दामधील सर्वात जास्त लक्षात घेण्याचे अक्षर आहे ’खु’. ह्या अक्षरामधील विविधता पहा. मोडी ’उ’ अक्षराच्या मध्यावर एक टिंब दिले किंवा मध्यापासून आडवी रेघ ओढली तर ’खु’ अक्षर तयार होते हे मोडी अभ्यासकांना माहित आहेच. ’खु’ अक्षर लिहिण्याची आणखी एक शैली आहे, ती आंग्लकालीन कागदपत्रांमध्ये सहसा आढळत नाही.

आता वरील चित्रामधील क्र. ४ वर असलेला ’राजीखुषीने’ हा शब्द पहा. जर पूर्ण शब्द माहित नसेल तर ते अक्षर ’खु’ आहे अशी शक्यतादेखील विचारात घेतली जाणार नाही.

मोडी ’सा’ प्रमाणे आकार काढून उकाराचा फराटा शिरोरेघेलाही पार करून ऱ्हस्व वेलांटीप्रमाणेपुन्हा अक्षराच्या दिशेने खाली आलेला आहे. असा ’खु’ अर्थातच घाईघाईत लिहिल्यामुळे किंवा लपेटीयुक्त लिहिताना हाताला लाभलेली गती आणि व बोटे हवी तिथे, हवी तशी न वळवता आल्यामुळे काढला जातो. केवळ आणि केवळ संदर्भानेच अशी अक्षरे वाचणं शक्य असतं.

No comments:

Post a comment