me

पुरालेखागार विभाग - Archive Department

राज्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची कागदपत्रे, इतिहासकालीन पत्र व्यवहार, शासन व्यवस्थेतले तसेच लोकांच्या खाजगी संग्रहातले महत्त्वाचे अभिलेख अशा अनेक कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि जतन राज्याचा पुराभिलेख विभाग करीत असतो. १८२१ मध्ये स्थापन झालेला पुरालेखागार विभागाने शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटीशकालीन तसेच स्वातंत्र्य लढयातील व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची अनेक महत्त्वाची कागदपत्रे जतन करुन ठेवली आहेत.

पुरा म्हणजे जुने आणि अभिलेख म्हणजे कागदपत्रे. ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे सुरक्षितरित्या जतन करण्यात येतात त्याला पुराभिलेख विभाग असे म्हणतात.

ब्रिटिशांनी भारतात इ.स. १६०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मात्र १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर त्यांनी राज्यकारभारातदेखील लक्ष द्यायला सुरूवात केली. इ.स. १८१८ मध्ये भारताचा संपूर्ण राज्यकारभार इंग्रजांच्या हातात गेला. ह्या काळात राज्यकारभार करण्याच्या दृष्टीने निर्माण झालेली कागदपत्रे जतन करण्याच्या आणि सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ब्रिटीशांनी एक मद्रास (१८१८), कोलकाता (१८१९) आणि मुंबई (१ सप्टें. १८२१) ह्या ठिकाणी एक तात्पुरती यंत्रणा उभारली. पण १८८५ मध्ये त्यांनी एक ठराव संमत करून त्यांनी ह्या यंत्रणेला अधिकृत स्वरूप दिले. ह्यालाच आज पुराभिलेख विभाग असे म्हटले जाते. आजच्या महाराष्ट्र राज्याचा हा सर्वात जुना विभाग आहे.

अभिलेखांचे जतन आणि संरक्षण करणे, अप्रकाशित कागदपत्रांचे प्रकाशन, तसेच आजदेखील ज्या व्यक्तींकडे अभिलेख आहेत त्यांचे संपादन (जतन, संरक्षण आणि कालक्रम, विषयानुसार यादी बनवणे) करणे, जतन केलेली कागदपत्रे इतिहास लेखन आणि संशोधनासाठी उपयोगी पडतील अश्या दृष्टीने संशोधकांना उपलब्ध करून देणे ही पुराभिलेख विभागाची कामे आहेत.

१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन म्हणून साजरा केला जातो.

भारत आणि भारताबाहेरील पुराभिलेखागारांची विस्तृत माहिती ह्या लिंकवर दिलेली आहे.

No comments:

Post a comment