me

'क्री’ अक्षर लिहिण्याची निराळी पद्धत

मोडी लिपीमध्ये ’कृ’ अक्षर लिहिण्याची पद्धत आपल्याला माहित आहे पण तेच अक्षर ’क्री’ लिहिण्यासाठीदेखील उपयोगात आलेले फारसे पाहण्यात येत नाही. सामान्यत: मोडी ’क’ ला देवनागरी ’क्र’ मधील अर्धा ’र’ जोडण्यात येतो.


मोडीमध्ये अमूक अक्षर विशिष्ट पद्धतीनेच लिहिले गेले पाहिजे ह्या समजूतीला छेद जातो तो अशा निराळ्या पद्धतीने लिहिलेल्या अक्षरांमुळे. अक्षर कसे लिहिले गेले आहे ह्यापेक्षा लिहिलेले अक्षर दस्तऐवज वाचताना गोंधळ न उडता संदर्भासहित सहज वाचले जाते आहे ह्या गोष्टीला प्राधान्य दिले जाते.

No comments:

Post a Comment

मोडी लिपीचे नि:शुल्क प्रशिक्षण यूट्यूबवर

/>