प्राचीन हस्तलिखितांचे किंवा घरातील जुन्या कागदपत्रांचे जतन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कितीही सांभाळली तरी काळाचा प्रभाव कागदासारख्या नाशिवंत वस्तूवर होणार हे नक्की! आपल्या भावी पिढ्यांसाठी ही जुनी कागदपत्रे इतिहासाचे साक्षीदार म्हणून जपून ठेवायची असतील तर सर्वप्रथम ह्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी करणे अनिवार्य आहे. स्कॅनिंग: चांगल्या ऑफिस स्कॅनरवर किंवा झेरॉक्सवाल्यांकडे कागदपत्रे स्कॅन करून मिळतात. हल्ली स्मार्टफोनकरीता देखील स्कॅनिंगची अॅप्स उपलब्ध आहेत; पण त्याचे काही तोटे आहेत. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे MP जितके असतात तितकीच क्षमता स्कॅनिंग अॅपची असते हे लक्षात असू द्या. स्मार्टफोनवर फोटो किंवा स्कॅनिंग करताना हात थरथरला तर त्याच्या परिणाम म्हणून फोटो/इमेज निकृष्ट दर्जाच्या येतात. तसेच, स्कॅनिंग करण्यासाठी फोन कोणत्या कोनात, दिशेत धरावा ह्याचे योग्य ज्ञान नसल्यास चुकीच्या पद्धतीने काढलेले फोटो किंवा इमेजेस निरुपयोगी ठरतात म्हणून झेरॉक्सवाल्यांकडून स्कॅन करून घेणे उपयुक्त किंवा साध्या स्कॅनरचा वापर करण्याइतपत कागदपत्रे लहान आकाराची नसतील तर पुराभिलेखागारांकडे मोठे स्कॅनर्स