कुणबी हा शब्द मोडी कागदपत्रांमध्ये कसा शोधावा?
‘कुणबी हा शब्द आमच्या कागदपत्रांतून शोधून द्या’ अशी विचारणा वारंवार फोन, WhatsApp वर होत आहे. केवळ एका शब्द शोधून काढण्यासाठी एकाच व्यक्तीचे १०-१५ कागद वेळेअभावी पहाणे शक्य होत नाही आणि गरवंतांना आपण वेळेवर मदत करु शकत नाही ह्याचंही वाईट वाटतं. म्हणून ही अल्पशी मदत आपल्या कागदपत्रांमधून हा शब्द शोधून काढायचा असतो त्यांच्यासाठी. सोबतच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्रत्यक्ष मोडी कागदपत्रांमधील ‘कुणबी’ हा शब्द कसा दिसतो ते चार वेळा दाखवले आहे. त्यावरुन आपल्या कागदपत्रांमध्ये ह्या शब्दाचा शोध घेता येईल. हा शोध सोपा व्हावा म्हणून आणखी एक टीप: कागदपत्रांमध्ये शक्यतो व्यक्तींची नावे जिथे लिहिलेली असतात तिथेच पुढे त्या व्यक्तीच्या जातीचा, वयाचा व व्यवसाय/नोकरीचा उल्लेख केलेला असतो. ह्याचसोबत आणखी एक सल्ला द्यावासा वाटतो की घरात खूप मोडी कागदपत्रे असतील तर स्वत: मोडी शिका आणि ते कागद वाचण्याचा प्रयत्न करा. नक्की जमेल.