Posts
मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?
१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.
२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.
३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.
फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.
मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline
आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी
आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.
२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.
३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.
फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.
मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline
आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी
काय असेल हा शब्द?
आधीच मोडी ही भरभर लिहिता येण्यासाठी तयार केलेली लिपी आहे. त्यात स्वत:च्या शैलीमुळे लेखनिक नवीन वाचकांसाठी एक-एक आव्हानच उभं करत असतात. पहिल्या वाचनात हा शब्द ‘पचजाग’ असा वाचला जाईल. अगदीच संशयाला वाव नको म्हणून ‘पचनाग, पचफग’ असंही वाचन केलं जाईल. पण मूळ मोडी शब्द आहे - पच्याग. पंचांग हा शब्द पंच्यांग असा लिहिण्याच्या प्रयत्नात लेखनिकांनी शब्दातले दोन अनुस्वार वगळले आहेतच पण ‘या’ ह्या अक्षराचं रुप किती बदललं आहे पहा. मोडीचा अभ्यास करताना शिकलेली अक्षरं आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधील अक्षरांमध्ये काय फरक असतो हे वाचनाचा सराव करतानाच कळतं.
विकृत कि विक्रीत?
संदर्भाने वाचन करणे योग्य कसे ठरते हे दाखवणारा आणखी एक नमुना. लाल चौकटीने दर्शविलेलं हे मोडी अक्षर आहे ‘कृ’. प्रत्यक्ष शब्द ‘विक्रीत’ असा आहे . त्यामुळे ‘क्री’ ह्या अक्षरासाठी ‘ ’ अश्या प्रकारे मोडीत लिहिले जाणे अपेक्षित आहे. पण एक-दोन अपवाद वगळता सर्वच मोडी लेखनिक ‘क्री’ लिहिताना लाल चौकटीत दर्शविल्याप्रमाणे लिहितात. मोडी वाचकाने हे लक्षात ठेवायचं आहे कि वाचन व लिप्यंतर करताना ह्या अक्षराचं लिप्यंतर क्री असंच करायचं आहे . अन्यथा शब्दाचा अर्थ विक्रीत ऐवजी विकृत असा होईल.