Posts

मोडी दस्तऐवज लिप्यंतरासाठी कसे पाठवावेत?

१. सर्वप्रथम आपल्या दस्तऐवजाची PDF तयार करायची आहे. त्यासाठी झेरॉक्स अथवा सायबर कॅफेवाल्यांकडे असतात तश्या स्कॅनर्सवर आपले दस्तऐवज 300dpi वर स्कॅन करुन घ्यावेत व सर्व फोटोंची मिळून एक PDF तयार करुन घ्यावी.

२. ही PDF, WhatsApp क्रमांक 9920028859 वर पाठवावी किंवा kanchankarai@gmail.com येथे इमेल करावी.

३. PDF पाठवताना आपला परिचय लिहावा. जसे: आपले नाव, फोन नंबर, पत्ता इ.

फोनवर संपर्क साधायचा असेल तर 9920028859 ह्या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ६ ह्या वेळेमध्ये सोमवार ते गुरूवार ह्या दिवसांत फोन करुन सविस्तर माहिती द्यावी.

मोडी लिपीच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी YouTube चॅनेल Subscribe करा. ModiScriptOnline

आमची नोंद गुगलवर: 4.9 Star Rating मोडी लिपी

आपले कागदपत्र पाठवायचे असल्यास कृपया येथे क्लिक करुन फॉर्मसोबत जोडावेत.

प्राचीन आणि अर्वाचीन अक्षरांमधील भेद

Image
Read in Hindi मोडी लिपी शिकत असताना लेखनाचा सराव करते वेळेस अक्षरांची वळणं प्रमाणबद्ध असावीत, अक्षर सुंदर नसलं तरी सुवाच्य असावं ह्याकडे आपण लक्ष पुरवतो. बोरू किंवा कट्‌ निबच्या लेखणीने लेखन करतो. पण ऐतिहासिक कागदपत्रांमधील अक्षर नीट न्याहाळलं तर आपला मोडी लेखनाचा सराव आणि त्या कागदपत्रांमधील अक्षरांची वळणं ह्यात अंतर असल्याचं दिसून येतं.

प्रसाद मासिकातील लेख

Image
'प्रसाद’ हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक म्हणून ओळखले जाते. ह्या मासिकाच्या जून २०१९ च्या अंकात माझा मोडी लिपीविषयी एक लेख प्रसिद्ध झाला आहे. विद्यादात्री वसुप्रदा मोडी लिपी . अवश्य वाचा. @mavipamum मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. एम.एन. गोगटे ह्यांनी पुण्याहून फोन करून प्रसाद मासिकामधील माझ्या मोडी लिपीबद्दलच्या लेखासाठी कौतुक केलं. #feelingblessed https://t.co/LL9PedBZYV — Kanchan Karai (@KanchanKarai) May 29, 2019 इमेजवर क्लिक केल्यास लेख डाऊनलोड करता येईल.

मोडी लेखन पद्धती २

Image
विचार करून मेंदूचा भुगा पडला पण हा शब्द काही केल्या कळेना. 😥 पूर्ण कागदात सगळीकडे हा शब्द होता पण त्या माणसाने नेमकं काय गहाण ठेवलंय हे लक्षातच येत नव्हतं. नंतर एका ठिकाणी ’शिंगे’ असा शब्द वाचल्यावर कळलं कि तो न कळलेला शब्द ’टोणगा’ असा आहे.

मोडी लेखन पद्धती

Image
'आढळल्यास' हा शब्द लिहिताना 'ढ' अक्षर कसे लिहिले आहे पहा. आधी मोडी 'व' अक्षराप्रमाणे वळण घेऊन मग मोडी 'ढ' लिहिला आहे.

दोन अपरिचित शब्द

Image
हे दोन शब्द नेहमीच्या मोडी दस्तऐवजांमध्ये क्वचितच आढळतात. त्यातच जर मोडी लेखन गुंतागुंतीचे असेल तर योग्य शब्द कळूनदेखील त्यांची खात्री वाटत नाही. कधी, कधी अशी परिस्थिती असते कि लेखन अतिशय किचकट असतं आणि ह्या दोन शब्दांशिवाय काहीच वाचता येत नाही. पण हे नवीन कळलेले दोन शब्दच संपूर्ण वाक्याचा अर्थ उलगडायला मदत करतात.